बेळगांव शहर व तालुक्यात आज सकाळी ढगाळ पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत पडला होता.
बेळगांव शहर आणि तालुक्यात आज सकाळी अत्यंत ढगाळ पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. पाऊस पडण्याची चिन्हे दर्शविणाऱ्या या वातावरणामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत पडले होते. सध्या तालुक्यात भात कापणी सुरू असून शेतातील अर्धे भात कापून झाले आहे. ठिकठिकाणी शेतात भाताच्या गंजी घातलेल्या दिसत आहेत.
या परिस्थितीत पावसाने हजेरी लावल्यास शेतात वळी घालून ठेवलेले भिजून जाणार होते. तसे झाल्यास आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार होते.
यामुळे संबंधित समस्त शेतकरीवर्ग चिंताक्रांत बनला होता. तथापि दुपारनंतर ढगाळ वातावरण दूर होऊन आकाश निरभ्र होण्याबरोबरच नेहमीप्रमाणे ऊन पडल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आगामी दिवसात पाऊस न पडणे हे बळीराजाच्या दृष्टीने फायदेशीर असणार आहे