बेळगाव महानगरपालिकेवर काल मध्यरात्री कस्तुरी भावी नामक महिलेने कन्नड युवकांच्या मदतीने मध्यरात्री महापालिकेवर कर्नाटकाची ध्वज फडकविला. नव्या महानगरपालिकेच्या इमारतीवर प्रथमच कर्नाटकी ध्वज फडकविण्याचा हा प्रकार घडला आहे.
यापूर्वी रिसालदार गल्ली येथील पालिका इमारतीवर कर्नाटकी ध्वज फडकविण्याचा प्रकार सातत्याने सुरु होता. त्यानंतर आता कस्तुरी भावी या महिलेच्या नेतृत्वाखाली हा प्रकार नव्या इमारतीसंदर्भात घडला असून, महानगरपालिका इमारतीवर कर्नाटकी ध्वज फडकविण्यासाठी या महिलेने शपथ घेतली होती.
आणि जोवर पालिकेवर कर्नाटकी ध्वज फडकवीत नाही तोवर पादत्राणे परिधान करणार नाही, असा प्रण घेतलेल्या महिलेने काही कन्नड युवकांच्या मदतीने हा ध्वज फडकविला. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून तातडीने हा ध्वज उतरविला. दरम्यान पोलीस, संबंधित महिला आणि युवकांमध्ये वादावादी झाली.