गोकाक तालुक्यातील वडेरहट्टी या गावातील इंद्रवेणी या गावात मे महिन्यात झालेल्या एका घटनेत साहसी काम केल्याबद्दल वडेरहट्टी येथील सिद्दप्पा केम्पन्ना हॊसट्टी आणि शिवानंद दशरथ हॊसट्टी या दोन मुलांचा जीवन रक्षा पदक आणि धनादेश देऊन गौरव करण्यात आला आहे.
८ मे २०२१८ रोजी गोकाक तालुक्यातील वडेरहट्टी या गावातील इंद्रवेणी या गावात पावसाच्या साचलेल्या पाण्यात अकस्मितपणे एक बालक पडले. त्याच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून सिद्दप्पा केम्पन्ना हॊसट्टी आणि शिवानंद दशरथ हॊसट्टी हे दोघेही तेथे धावले.
आणि आपल्या जीवाची पर्वा न करता त्या बालकाला वाचविले. त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल त्यांना महिला आणि बालकल्याण विभागाच्यावतीने१४ नोव्हेंबर २०१८ रोजी गौरविण्यात आले होते.
केंद्र गृह मंत्रालयाच्यावतीने त्यांच्या या साहसी कार्याची दखल घेऊन जीवन रक्षा पुरस्कार तसेच एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्याचे जाहीर करण्यात आले होते.
सदर युवकांना बेळगाव पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाहीर करण्यात आलेले पदक, धनादेश आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पोलीस आयुक्त आणि उपपोलीस आयुक्तांच्या हस्ते या दोन्ही मुलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.