निवार चक्रीवादळाच्या परिणामामुळे आज बेळगावमध्ये थंडीने वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. पहाटेपासून थंडगार वारे आणि दिवसभर हुडहुडी अनुभवणाऱ्या बेळगावकरांनी थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटीचा आधार घेतला आहे. तर, अनेकांनी आपले ठेवणीतले ऊबदार कपडे बाहेर काढले आहेत.
आज बेळगावचे स्थिर कमाल तापमान २१.३ सेल्सियस इतके नोंदविले गेले आहे तर सामान्य तापमान -८, किमान तापमान १७.० अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले आहे.

आज शनिवार संपूर्ण दिवसभरात सूर्याचे दर्शन बेळगावकरांना अनुभवता आले नसून ढगाळ वातावरण आणि थंडीच्या हुडहुडीमुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता. अनेक ठिकाणी नागरिक शेकोटीचा आधार घेतानाही दिसून आले तर बेळगावमध्ये काश्मीरच्या थंडीची अनुभूती नागरिकांनी घेतली.
आज सर्वत्र एअरकंडिशनरप्रमाणे तापमानात कमालीचा गारठा जाणवत असतानाच रात्रीही थंडीचा पारा घसरण्याची शक्यता आहे.थंडीत बेळगाव तालुक्यातील शिवारात भात मळणीचा मोसम जोरात सुरू झाल्या आहेत.