Wednesday, January 15, 2025

/

फटाक्यांवरील बंदीचा सुपरिणाम : बेळगांवच्या प्रदूषणात घट

 belgaum

फटाक्यांवर घातलेल्या बंदीचे सकारात्मक परिणाम यंदा दिवाळी सणाच्या काळात पहावयास मिळाला असून या कालावधीत बेळगाव शहरातील ध्वनी आणि वायु प्रदूषणात वाढ झाली नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले आहे.

बेळगांवच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या 9 आणि 10 नोव्हेंबर रोजीची ध्वनी व वायू प्रदूषणाची पातळी आणि त्यानंतर 14 ते 16 नोव्हेंबर या काळातील प्रदूषणाची पातळी तपासली त्यावेळी ही बाब मंडळाच्या निदर्शनास आली आहे. गेल्या 14 नोव्हेंबर रोजी बेळगावात दिवाळीच्या पाडव्यालासह बलिप्रतिपदा आणि लक्ष्मीपूजनादिवशी ध्वनी व वायू प्रदर्शनात थोडी वाढ झाल्याचे मंडळाचे म्हणणे आहे परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रदूषण फारच कमी असल्याचे बेळगांवचे प्रदूषण नियंत्रण अधिकारी गोपाळकृष्ण संतनगी यांनी सांगितले

यंदा संपूर्ण कर्नाटकात दिवाळी सणा दरम्यान प्रदूषण कमी झाल्याचा राज्य शासनाचा दावा आहे हे धोरणाच्या पार्श्वभूमीवर यंदा देशातील काही राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे कर्नाटकनेही त्यांचे अनुकरण करत प्रारंभी फटाक्यांवर बंदी घातली मात्र नंतर हरित फटाके वाजवण्याची मुभा दिली. बेळगांवात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. तथापि यंदा अपवाद वगळता बहुतेक सर्व व्यापाऱ्यांनी फटाके न वाजविताच लक्ष्मीपूजन केले. फटाके वाजविण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे फलित अंश म्हणजे यावेळी दिवाळीदरम्यान बेळगांवातील प्रदूषणात धोकादायक वाढ झाली नाही.

ऑटोनगर येथे कार्यालय असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपला अहवाल बेंगलोरच्या मुख्यालयाकडे पाठविला आहे. सदर अहवालानुसार गेल्या दि. 9 नोव्हेंबर रोजी बेळगांवातील ध्वनिप्रदूषणाची पातळी 52.48 डेसीबल इतकी होती. दि. 14 नोव्हेंबर रोजी ही पातळी 64.3 डेसीबल झाली, 15 रोजी 58.4 डेसिबल तर 16 नोव्हेंबर रोजी 60.2 डेसीबल इतकी होती. वायू प्रदूषणाच्या बाबतीतही असेच झाले असून 10 नोव्हेंबर आणि दिवाळी सणात म्हणजे दि. 14, 15 व 16 नोव्हेंबर रोजी वायू प्रदूषणाची पातळी तपासली असता प्रदूषणात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वरील तिन्ही दिवशी दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत वायू प्रदूषणाचे प्रमाण जास्त होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.