मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात पाऊस झाला आहे .या वातावरणामुळे सुगी कामे रेंगाळली असून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
विशेष करून ग्रामीण भागात शनिवार वादळाचा फटका बसला आहे. शनिवारी पहाटेपासून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रविवारी तशीच परिस्थिती आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी धावपळ करत आहेत. बेळगावचा पारा घसरत आहे.परिणामी सुगीवर मोठा परिणाम होत आहे.
खरीप हंगामातील सुगी हंगामात तालुक्यातील कामे जोरात सुरू करण्यात आली होती. भात कापणी व मिळण्याची कमीही जोमात सुरू आहेत. परंतु वादळाच्या निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे मोठा फटका बसला आहे. कामात गुंतलेले शेतकरी सध्या धावपळ दिसत आहेत. जोरदार वारा ढगाळ वातावरण यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यामुळे कधी एकदा ढगाळ वातावरण जातंय आणि कधी एकदा सुगीला सुरुवात होते. याच विवंचनेत शेतकरी अडकून पडला आहे.
दोन दिवसापासून जोराचे वारे वाहू लागले आहेत. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. कापून टाकलेले भात पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.
सध्या 25 टक्के भात पिकांची मळणी व इतर कामे आटोपते घेण्यात आली असली तरी अजूनही बरीच कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा पाऊस जावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करण्यात येत आहे.