दिवाळीनिमित्त बँकांना चार दिवस सुट्टी असताना धर्मवीर संभाजी चौक येथील केळकर बागेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी असणारे एटीएम बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होण्याबरोबरच त्यांचा हिरमोड होत आहे.
ध. संभाजी चौक येथील केळकर बागेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी असणारे एटीएम बंद सध्या बंद आहे. दिवाळीनिमित्त बँकांना चार दिवस सुट्टी आहे अशा परिस्थितीत ऐनमोक्याच्या ठिकाणी असणारे एसबीआय बँकेचे एटीएम बंद असल्यामुळे परिसरातील नागरिक व दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित दुकान गाळ्याचे विजेचे बिल भरले नसल्यामुळे सदर एटीएम बंद ठेवण्यात आले असल्याचे समजते. या एटीएमपासून अवघ्या कांही पावलांवर धर्मवीर संभाजी चौक बसस्थानक आहे.
ध. संभाजी चौकात शहरी-ग्रामीण आणि परराज्यातील बस गाड्यांचे थांबे असल्यामुळे याठिकाणी प्रवाशांचा मोठ्या संख्येने वावर असतो. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि धर्मवीर संभाजी चौक परिसरातील लोकांसाठी अडचणीच्या वेळी पैसे काढण्यास हे एटीएम अत्यंत सोयीचे ठरत होते.
सध्या हे एटीएम बंद असून ते आता लवकर सुरू होणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी बँका बंद असताना ऐनदिवाळीत गैरसोय होणार असल्याने परिसरातील नागरिक, दुकानदार आणि बस प्रवाशांचा हिरमोड होताना दिसत आहे.