Friday, December 27, 2024

/

डीसीसी बँकेवर अरविंद पाटलांचा झेंडा!

 belgaum

बेळगावच्या राजकारणाचा कणा म्हणून ओळखली जाणारी डीसीसी बँकेची निवडणूक आज पार पडली असून या बँकेवर समितीचे खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. याआधी १६ जागांपैकी १३ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. उर्वरित ३ जागांसाठी चुरशीची लढत असणाऱ्या या निवडणुकीत माजी आमदार अरविंद पाटील यांनी सलग चौथ्यांदा आपला झेंडा रोवला आहे.

आज सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. ऐनवेळी या निवडणुकीची दिशा बदलली होती. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील रिसॉर्टपर्यंत सूत्रे वळविण्यात आली होती. एकूण ४८ मतदारांसह आणखी ४ नव्या मतदारांनी कोर्टाचा आदेश आयत्यावेळी मिळवून आज मतदान केले होते. या निवडणुकीत २७ मताधिक्याने अरविंद पाटील हे विजयी झाले असून अंजलीताई निंबाळकर यांना २५ मते मिळाली आहेत.

या निवडणुकीदरम्यान पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी माजी आमदार अरविंद पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल वक्तव्य करून आणि अरविंद पाटील यांना भाजपचा पाठिंबा दर्शवून निवडणुकीची दिशा बदलली होती. दरम्यान अंजलीताई निंबाळकर आणि अरविंद पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली होती.Dcc bank arvind patil

बेळगावच्या राजकारणाची दिशा ठरविणारी हि निवडणूक, निवडणुकीची तयारी, मतदारांची मोर्चेबांधणी आणि निवडणुकीचा निकाल हा प्रवास अत्यंत उत्सुकतेचा विषय होता. एकूण ४८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. परंतु आयत्यावेळी ४ नवे मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी कोर्टाकडून आदेश घेऊन मतदान केले.

या निवडणुकीदरम्यान अंजलीताई समर्थक मतदार आणि अरविंद पाटील समर्थ मतदार महाराष्ट्रातील रिसॉर्टमध्ये मोर्चे बांधणी करताना आढळून आले. राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आणि हेवेदावे करण्यात येऊ लागले. केवळ सहकार क्षेत्रच नाही तर राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांमधूनही या निवडणुकीचे कुतूहल होते.

या निवडणुकीत ५२ पैकी २७ मते मिळवून महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार अरविंद पाटील हे विजयी झाले आहेत. अरविंद पाटील यांची डीसीसी बँकेवर निवडून येण्याची चौथी वेळ असून या विजयानंतर ते समितीशी बांधील राहतील कि भाजपाकडे आपला मोर्चा वळवतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.