बेळगांवच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे येत्या 15 डिसेंबर 2020 पासून शिवाजी स्टेडियम एमएलआयआरसी बेळगाव येथे भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर ट्रेडमन (10 वी पास), सोल्जर ट्रेडमन (8 वी पास) आणि सोल्जर क्लार्क / एसकेटी या श्रेणीसाठी हा भरती मेळावा आयोजित केला आहे.
सदर मेळावा 15 ते 19 डिसेंबर आणि 21 ते 23 डिसेंबर 2020 या कालावधीत होणार असून 31 जानेवारी 2021 व 28 फेब्रुवारी 2021 रोजी लेखी परीक्षा होणार आहे. उमेदवारांसाठी कोरोनाचा आरटी-पीसीआर निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट अनिवार्य असणार आहे.
सोल्जर जनरल ड्युटी श्रेणीसाठी उमेदवाराचे वय 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्षे इतके असावे. त्याचा जन्म 1 ऑक्टोबर 1999 च्या आधी आणि आणि 1 एप्रिल 2003 नंतर झालेला नसावा. सोल्जर ट्रेडमॅन आणि सोल्जर क्लार्क / एसकेटी श्रेणीसाठी उमेदवाराचे वय 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्षे इतके असावे.
त्याचा जन्म 1 ऑक्टोबर 1997 च्या आधी आणि 1 एप्रिल 2003 नंतर झालेला नसावा. पात्र उमेदवारांनी भरतीच्या ठराविक दिवशी ठीक पहाटे 5 वाजता शिवाजी स्टेडियम एमएलआरसी बेळगाव येथे हजर राहणे आवश्यक आहे.