बेळगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात व मका सरकारच्या हमी भावाप्रमाणे खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी बेळगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.
बेळगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने आर. के. पाटील, महेश जुवेकर व मनोज मत्तिकोप यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सादर केले. एपीएमसी अध्यक्ष गैरहजर असल्यामुळे सेक्रेटरी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे येत्या या एक-दोन दिवसात खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत आदेश निघणार असल्याचे सांगितले.
सध्या भात व मका पिकाची सुगी सुरू असून खुल्या बाजारात भात व मका यांचे दर हमीभावापेक्षा खूपच खाली आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे अवघड झाले आहे. यामुळे भात व मका उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होणार आहे.
यासाठी वेळेवर हमीभाव खरीदी केंद्र सुरू केल्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. यासाठी आम्ही बेळगांव तालुक्यातील शेतकरी सरकारी हमी भावाप्रमाणे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करत आहोत.
तेंव्हा शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी हे खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.