Monday, December 23, 2024

/

ख्यातनाम हत्ती संरक्षक व तज्ञ अजय देसाई कालवश

 belgaum

ख्यातनाम जीवशास्त्रज्ञ आणि हत्ती संरक्षक -तज्ञ अजय अदृश्याप्पा देसाई यांचे आज शुक्रवारी निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 62 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, स्वप्निल व आर्यन ही दोन मुले, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.

मूळचे बेळगांवचे रहिवासी असलेले अजय देसाई हे देशातील मातब्बर हत्ती तज्ञापैकी एक होते. त्यांचे शालेय शिक्षण कॅम्प येथील सेंटपॉल हायस्कूलमध्ये झाले.

बॉम्बे नॅचरल हिस्टरी असोसिएशनचे संशोधक असलेल्या अजय देसाई यांनी ऐंशीच्या दशकात मुथमलाई जंगलात अनेक वर्षे काम केले होते. त्यांनी हत्तींसाठी रेडिओ कॉलर अस्तित्वात आणली.Ajay desai

मानवी वसाहतीतील जंगली हत्तींच्या प्रवेशाला जंगलतोड कारणीभूत असल्याचे अजय देसाई यांचे स्पष्ट मत होते. हत्तींच्या बाबतीत मोठा अभ्यास असणाऱ्या देसाई यांना देशाच्या अनेक भागातील हत्तींची स्थिती माहीत होती.

वायव्येकडील केरळ कर्नाटक आणि आसाम या राज्यातील जंगले हत्तींचे “हत्या क्षेत्र” असल्याचेही त्यांचे मत होते. वाईट लाइफ ऑफ इंडियाचे आशियाई हत्ती सल्लागार असणारे अजय देसाई वर्ल्ड वाईल्ड फंडचेही (डब्ल्यूडब्ल्यूएफ) सल्लागार होते.

त्याप्रमाणे देसाई हे यूएनओ आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस या संघटनेचे सदस्य होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.