या वर्षी बेळगाव तालुक्यात पाऊस जरा जास्तचं झाल्याने अनेक ठिकाणी भात पिकाला नुकसान झाले आहे त्यामुळे नेहमी पेक्षाकमी उत्पादन होणार आहे मात्र नंदीहळळीत वकील मारुती कामाणाचे यांच्या शेतात त्यांनी शुभांगी या भात पिकाचे विक्रमी पीक घेतले आहे.
कामाणाचे यांनी आपल्या शेतात शुभांगी या भात पिकाची लागवड केली व निगा राखली आता ते भात पीक उत्तम रित्या आले आहे या साठी बियाणे कंपनी सफल सीड्स आणि बायोटेक कंपनीकडून अड मारुती कामाणाचे यांचा सत्कार करण्यात आला.
लॉक डाऊन काळात सर्व कामे संथ गतीने चालली होती त्यामुळे शेताकडे पुरेसा वेळ देण्यास मिळाला.या फावल्या वेळेचा फायदा घ्यावा म्हणून आम्ही नंदीहळळी येथील 20 गुंठे जमिनीत शुभांगी या भात बियाणांची लागवड केली.या पिकात प्रति एक गुंठा 2 पोती भात मिळण्याची शक्यता आहे असे मारुती कामाणाचे यांनी सांगितले.
भाताच्या एका लोंबाला(फांदीला)370 ते 430 दाणे लागले आहेत सध्या वाढ आणि पोसवणी चांगली चांगली झाली आहे याबद्दल सफल सीड्स द्वारे त्यांचा सत्कार कऱण्यात आला.
पेशाने वकील असलेल्या मारुती कामाणाचे यांनी या भाताला गावातील शेतकऱ्याच्या सल्ल्यानुसार तीन नमुन्याचे खत मिक्स करून भाताला दिले.औषधांची फवारणी करून भाताची भांगलन देखील उत्तम रीतीने केली होती त्यामुळे आता भात पिकाची लागवड उत्तम रीतीने होणार आहे.
सफल सीड्स बायोटेक कंपनीचे रिजनल मॅनेजर एम एन इनामदार हे भात पिकाची पहाणी करण्यासाठी शेतावर आले होते.सातेरी नागोजीचे,मनोहर पाटील आणि परशराम बेळगावकर हे देखील उपस्थित होते.सफल सीड्सच्या वतीनं भाताची उत्तम देखभाल केल्यामुळे वकील मारुती कामाणाचे यांचा सत्कार केला.