मागील दोन-तीन महिन्यांपासून ग्रामपंचायतीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुका अद्याप जाहीर नसल्या तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मात्र ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिवसातून एक तरी ग्रामपंचायतीला भेट द्यावी आणि तेथील समस्या जाणून घ्यावेत अशा सूचना तालुका पंचायत सदस्य निलेश चंदगडकर यांनी केल्या आहेत.
नुकतीच तालुका पंचायत बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना वरील सूचना केल्या आहेत. अनेक कामे ग्रामपंचायतीमध्ये रेंगाळत पडले असून ही कामे करण्यासाठी पिडिओ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे एकमत हवे असते.
मात्र प्रशासकीय काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे तर काही अधिकारी केवळ नावापुरतेच राहिले आहेत.
त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार दुर्लक्षित होत आहे परिणामी याचा फटका नागरिकांना बसत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासकीय काळात विकास कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी एकाही अधिकार्याने आतापर्यंत ग्रामपंचायतीला भेट दिली नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त असल्याचेही निलेश चंदगडकर यांनी सांगितले. पीडीओ मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत.
याकडे गांभीर्याने लक्ष देणे ही यावेळी बैठकीत त्यांनी व्यक्त केले. बैठकीला सुनील अष्टेकर यल्लाप्पा कोळेकर नारायण नलावडे लक्ष्मी मैत्री मधुरा तेरसे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.