दिवाळीची धामधूम, बंदोबस्त आणि इतर कामे असतानाही एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी चोरीची तक्रार आल्याच्या फक्त 5 तासांच्या आत चोर महिलांना अटक केली आहे. त्यांनी चोरलेले साडेचार लाख परत मिळवण्यात यश मिळवले आहे.
योगेश भरत छाबडा (कुवेम्पू नगर)यांनी हजर होऊन आपली तक्रार दिली होती.दि11 ला रात्री 9 ते दि 13 च्या सकाळी 11 च्या दरम्यान त्यांच्या घरातील कपाटातील 4 लाख 50 हजार चोरले गेले होते.यासंदर्भात तक्रार येताच जावेद मुशापुरी यांनी लगेचच तपास चक्रे फिरविली आणि दोन महिलांना अटक केली आहे.
जे एम एफ सी चतुर्थ न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन यासंदर्भातील सर्व कारवाई करण्यात आली आहे.
मरियम्मा बाबू परीसपोगु (वय 38 ) रा.बंजारा कॉलनी आणि अनिता यल्लप्पा कांबळे (वय 32) रा. जनता कॉलनी बाची अशी त्या महिलांची नावे आहेत.
अटक करून चोरीचे पैसे ताब्यात घेण्यात आले आहेत.दोन्ही महिलांना न्यायालयासमोर हजर करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सिपीआय जावेद मुशापुरी यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.