पोहण्यास गेलेल्या एक युवक घटाप्रभा नदीत बुडालेल्याची घटना चिकडोळ्ळी (ता. गोकाक) येथे बुधवारी सायंकाळी घडली.
नदीमध्ये बुडालेल्या युवकाचे नांव रुद्राप्पा वकुंद (वय 19 वर्षे) असे आहे. काल सायंकाळी गोकाक तालुक्यातील चिकडोळ्ळी गावानजीकच्या घटप्रभा नदी पात्रात पोहण्यास गेला असता रुद्राप्पा नदीत बुडाला.
सदर घटनेची माहिती मिळताच जीवरक्षक तुकडीने शोधकार्य हाती घेतले. त्याबरोबर एनडीआरएफ व अग्निशामक दलाची तुकडेही या कार्यात सहभागी झाली आहे. एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध सुरू केला आहे.
घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि युवकाचे कुटुंबीय हजर झाले असून कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे. गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.