Tuesday, December 24, 2024

/

वन्यजीवांचा वावर नागरी वस्तीकडे

 belgaum

मागील काही वर्षांपासून वन्यजीवांचा वावर नागरिक वसत्यांकडे वाढू लागला आहे. याचे नेमके कारण काय असेल याकडे पाहणेही गरजेचे वाटू लागले आहे. बेळगाव शहर आणि उपनगरात वन्यजीव आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांकडे एक भीती निर्माण झाली असून वन्यजीव नागरी वस्तीत येऊ लागल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे.

नुकतेच बेळगाव येथील भाग्यनगर येथे साळीद्र आढळून आले आहे. याच बरोबर आणखी एका ठिकाणीही जंगलात राहणारे साळीद्र आढळून आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांपासून वन्यजीव नागरी वस्तीकडे वळू लागली आहेत. याचे मुख्य कारण जंगलातील पाणीसाठा कमी असल्यामुळे वन्यजीव नागरी वस्तीकडे वळतात तर दुसरे म्हणजे जी होणार जंगल तोड याला कारण ठरू शकते.

मात्र मागील दोन वर्षांपासून जंगलांमध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात वन्यजीवांना उपलब्ध आहे. मात्र जंगलांची होणारी वृक्षतोड याला कारणीभूत ठरू शकते का? याचा विचार करणे गरजेचे ठरले आहे.

अन्यथा पुढे भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या वन्यजीव नागरी वस्तीत येऊ लागल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे जर अशीच वृक्षतोड झाली तर वन्यजीव नागरी वस्तीत वारंवार येण्याचे प्रकार घडू शकतात.

याची दखल आता संबंधित नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी घेण्याची गरज आहे. ज्या भागात जंगल आहे त्या भागातील वृक्षतोड थांबवण्यासाठी वनखात्याने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.