बेळगाव जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे येथील वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकंदरीत आतापर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या वाहनांची संख्या 20 लाखाच्या घरात असली तरी बेळगाव आणि खानापूर तालुक्यात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची संख्या सहा लाखाच्या घरात पोहोचली आहे.
यामध्ये दुचाकी-चारचाकी आणि इतर वाहनांचा समावेश आहे. बेळगाव आरटीओ विभागाचा कारभार मोठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र याला उप-विभाग जोडून बेळगाव जिल्ह्यात एकूण पाच उपविभाग निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगाव जिल्हा आरटीओ विभागा वरील बोजा कमी झाला आहे. मात्र तालुक्यातील वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
सध्या बेळगाव खानापूर तालुक्यात पाच लाख 92 हजार 98 वाहने रस्त्यावर येरझाऱ्या मारत आहेत. यामध्ये 47 हजार 331 दुचाकी वाहने 59 हजार 870 चारचाकी वाहने तर यासह इतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बेळगाव शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येत भर पडू लागली आहे. बेळगाव शहर आणि खानापूर तालुक्यात ही संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकूण सहा लाख वाहनांची नोंदणी करण्यात आली असून नोंदणी नसलेल्या वाहनांचा तपासणी करण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगाव शहर आणि परिसरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. परिणामी ही संख्या आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. अधिक तर चारचाकी वाहनांचा समावेश मोठ्या प्रमाणात असून त्यांची नोंदणी ही अधिक झाली आहे. बेळगाव खानापूर तालुक्यात सहा लाख तर इतर उप 5 आरटीओ कार्यालयातील संख्यांची आकडेवारी वीस लाखाच्या घरात पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान ही संख्या वाढत असली तरी महसुलातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका आरटीओ कार्यालयाला बसला. मात्र त्याची कमतरता भरून काढण्यासाठी आरटीओ कार्यालयातून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे याकडे आरटीओ प्रशासन गांभीर्याने लक्ष देत असून महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.