बेळगाव शहर व उपनगरात ठकविणाऱ्याची संख्या काही कमी नाही. वारंवार अनेक नागरिकांना भूलथापा घालून फसविण्याचे प्रकार वाढीस लागले असताना नुकतीच बेळगाव येथील अमित नामक एका व्यक्तीने स्मित भाष्य करून सराफी दुकानदारांना फसवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सध्या याबाबत पोलिसात तक्रार नसली तरी याची चर्चा जोरदार सुरू आहे. मागील काही दिवसांपासून तो गायब झाला आहे आणि त्याचा फोनही स्विच ऑफ करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
बेळगाव कोल्हापूर सांगली येथील सराफी व्यवसायात काम करून सुमारे अडीच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन संबंधित कोल्हापूरचा युवक गायब झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली असून तब्बल अडीच कोटी रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला करणारा कोण याचा शोध सुरू आहे. बेळगाव येथील सराफ व्यवसायिकांना भूलथापा मारून दिवसापासून तो गायब झाला आहे.
माझे एका तरुणीशी प्रेम आहे. त्यामुळे मी दोन तीन दिवस बाहेर जाणार आहे. त्यानंतर मी परत येणार आहे. जर मला मला यायला उशीर झाला तर आठ दिवस फोन लावू नका असे सांगून त्याने सराफी व्यापाऱ्यांना फशी पडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. आता त्याचा फोन स्विच ऑफ लागत आहे.
त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून याबाबत अजूनही पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली नाही. मात्र संबंधित युवकाचे नाव अमित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी ही बाब बेळगाव शहर आणि परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.