टिळकवाडी येथील एका अपार्टमेंटमध्ये वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या एका महिलेला टिळकवाडी पोलिसांनी आज शनिवारी अटक केली. तसेच दोन महिलांची वेश्या व्यवसायातून मुक्तता केली.
टिळकवाडी येथील आरपीडी कॉर्नर नजीकच्या आश्रय एम्पायर या इमारतीमध्ये उपरोक्त कारवाई करण्यात आली. दीपा वेंकटेश पाच्छापूर (वय 37, मूळ रा. चन्नम्मानगर सध्या रा. आश्रय एम्पायर, खानापूर रोड, टिळकवाडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नांव आहे. सदर महिला वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी तात्काळ धाड टाकून दीपा हिला अटक केली.
तसेच याठिकाणी वेश्याव्यवसायात जुंपण्यात आलेल्या दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली. टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक बडगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.