निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. अजून तरी ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख जाहीर झाली नसली तरी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायतसाठी निवडणुकीमध्ये प्रयत्न करत असून आतापासूनच त्याने आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून तालुका पंचायत मध्ये मात्र निधीची कमतरता भासते. अनेक जण तालुका पंचायत निवडणुकीमध्ये पैसा खर्च करून येतात. मात्र निधीअभावी मोठी समस्या निर्माण होत असल्याने आता अनेकांनी आपला मोर्चा ग्रामपंचायतीकडे वाढवल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वार्ड निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असल्याने आता संबंधित तालुका पंचायत सदस्य आपापल्या मतदार क्षेत्रात मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसून येत आहेत.
त्यामुळे अनेक जण ग्रामपंचायत साठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुका पंचायत पासून पुन्हा ग्रामपंचायत मध्ये जाण्यासाठी पुन्हा एकदा खडतर प्रवास संबंधितांना करावा लागणार आहे. मात्र गाठीभेटी घेऊन आतापासूनच मतदारांच्या मनातील भेद जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक तालुका पंचायत सदस्य सध्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.