भ्रष्टाचार करणे चुकीचे आहे आणि मुळात दुसऱ्यांचे नाव सांगून भ्रष्टाचार करणे हे तर पापच आहे. मात्र काही ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तसे करणे सुरू केले आहे. माझे नाव सांगून भ्रष्टाचार करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे जर माझे नाव सांगून भ्रष्टाचार कराल तर तुमची गय केली जाणार नाही, असा इशारा तालुका पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी दिला आहे.
नुकतीच ग्रामविकास अधिकार्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांना खडसावून सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारे यापुढे भ्रष्टाचार करू नये आणि नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर रहा, आळस झटका आणि कामाला लागा असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यापुढे भ्रष्टाचार करू नये आणि माझे नाव घेऊन तर अजिबात असे गैरकृत्य केल्यास मी त्याची गय करणार नाही.
पहिला निलंबनाची कारवाई करेन आणि नंतरच त्याला पोलिसांच्या स्वाधीन करेल असा इशाराही त्यांनी बैठकीत दिला आहे. या बैठकीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. भ्रष्टाचारानी तर बैठक अर्धवट सोडून तेथून पोबारा केला आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देत असल्याचे सांगून नागरिकांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून पाऊल उचलल्यास योग्य ठरेल असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे याकडे प्रत्येक ग्राम विकास अधिकार्यांनी लक्ष द्यावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करू असा इशाराही बैठकीत मल्लिकार्जुन यांनी दिला आहे.
जर चुकीचे वागल्यास त्याला शिक्षा होणार आणि जे प्रामाणिक असतील त्यांना बक्षीस देऊ असेही त्यांनी सांगितले आहेत. त्यामुळे यापुढे तालुक्यातील विकासासाठी जटा उठा आणि कामाला लागा असे आवाहन करत त्यांनी बैठकीचे सांगता केली. यावेळी तालुका पंचायत सहाय्यक सचिव राजेंद्र मोरबत उपस्थित होते.