तालुक्यातील मुख्य मार्केटिंग सोसायटी म्हणून तालुका मार्केटिंग सोसायटी पाहिले जाते. कधीकाळी ही सोसायटी मराठ्यांच्या ताब्यात होती. मात्र कालांतराने राजकीय वजन आणि मराठीमधील फूट यामुळे आता बेळगाव येथील तालुका मार्केटिंग सोसायटी मराठ्यांच्या हातातून निसटली आहे तर होऊ घातलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांमध्ये तरी उमेदवारी देण्यासाठी नेते धडपडणारा का असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित करण्यात येत आहे.
तालुका मार्केटिंग सोसायटीमध्ये काँग्रेस आणि भाजपने संगनमत करून मराठ्यांना बाजूला सारले तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार सुनील अष्टेकर यांनी तालुका मार्केटिंग सोसायटीमध्ये अर्ज भरला होता. मात्र एका मराठी नेत्याने त्यांचा घात केला अशी चर्चा आहे.
डी सी सी बँकेत एक कन्नड भाषिक नेत्याला विजयी करण्यासाठी तालुक्यातील मराठी पथ संस्थांना दीड लाख रुपये वाटून मराठीचा गळा चिरन्यात आल्याची देखील
चर्चा आहे.मात्र यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतेही मूग गिळून गप्प बसले आहेत. या त्यांच्या कारभारामुळे इच्छुक उमेदवार मात्र हतबल झाले आहेत. नको तेव्हा मराठी मराठीच्या नावावर पोळी भाजून झोळी भरून घेणारे नेते आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकासाठी का पुढे येत नाहीत असा सवाल सर्वसामान्यातून उपस्थित करण्यात येत आहे.
त्यामुळे तालुका मार्केटिंग सोसायटी वरील असणारी सत्ता मराठी नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे गमावण्यात आली असली तरी आता जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे तरी लक्ष देऊन तेथे उमेदवार आणावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याकडे गांभीर्याने विचार करून उमेदवार देण्याची तयारी करावी मराठी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा सार्यांना लागून राहिली आहे. मात्र आता ही जर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक हातातून गेली तर भविष्यात बेळगाव येथील मराठी सत्ता संपुष्टात येणार यात शंका नाही. काही मराठी नेते राष्ट्रीय पक्षांच्या नादी लागून आडकाटी घालण्यात सरस ठरत आहेत. त्यामुळे आतातरी प्रबळ उमेदवार उभे करून मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांमध्ये मराठीची सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज दिसून येत आहे.
यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुका ही जाहीर होणार आहेत. त्यामुळे आतापासूनच सत्ता टिकवण्यासाठी मराठ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.