Wednesday, January 22, 2025

/

गुगल प्लेमध्ये “बेळगाव सिटीझन्स ॲप” जनसेवेसाठी तैनात

 belgaum

बेळगांव स्मार्ट सिटी लिमिटेडने गुगल प्लेमध्ये “बेळगावी सिटीझन्स ॲप” जनसेवेसाठी तैनात केले असून बेळगांववासियांनी या ॲपचा पुरेपूर उपयोग करावा, असे आवाहनही केले आहे.

बेळगांव सिटीझन्स ॲप अर्थात माय बेळगावी ॲपवर शहर प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या स्मार्ट उपायांची माहिती नागरिकांना मिळू शकणार आहे. बेळगांव शहरवासीयांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी माय बेळगावी ॲप हा अत्यंत जलद आणि सोपा मार्ग असणार आहे. या ॲपद्वारे कोणत्याही वेळी नागरिक आपल्या तक्रारी मांडू शकतात तसेच तक्रारींबाबत जाणून घेऊ शकतात.

शहर प्राधिकरणाने नागरिकांच्या हितासाठी जे अनेक उपाय उपलब्ध करून दिले आहेत त्यांची इतंभूत माहिती या ॲपवर मिळू शकणार आहे.

याखेरीज यामधील एसओएस वैशिष्ट्य द्वारे गरज पडेल तेंव्हा पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक दल, महिला आपत्कालीन स्थिती आदीं संदर्भात मदत मिळू शकतात. त्याप्रमाणे बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने अद्ययावत केलेल्या ताज्या बातम्या, घटना, हवामान आणि नजीकचे प्रमुख स्थळे याबाबतची माहिती बेळगांवकरांसाठी या ॲपवर उपलब्ध असणार आहे.

My belgavi app
Belgaum Smart City Limited Belgaum Smart City Has Deployed My Belagavi Citizen App in the Google Play , Citizens of Belagavi are Advised to make use of it
Belagavi Smart City Working Towards Better Urban Living . https://play.google.com/store/apps/details?id=com.mybelagavi&hl=en

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.