केंद्रसरकार राष्ट्र हितार्थ राबवित असलेल्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत (आम आदमी) पोहोचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनकल्याणकारी प्रचार -प्रसार अभियान या संघटनेच्या कार्याचा शुभारंभ आज सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात करण्यात आला.
प्रमुख पाहुणे मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते प्रधानमंत्री जनकल्याणकारी प्रचार -प्रसार अभियान या संघटनेच्या कार्याचा हा शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला. प्रधानमंत्री जनकल्याणकारी प्रचार प्रसार अभियान ही संघटना केंद्र सरकारच्या विविध योजनांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारासाठी स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्र हितार्थ पर्यायाने जनहितार्थ केंद्र सरकार कडून राबविल्या जाणाऱ्या योजना तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत (आम आदमी) पोहोचाव्यात यासाठी ही संघटना कार्यरत राहणार आहे, असे शंकरगौडा पाटील यांनी शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर बोलताना सांगितले.
तसेच त्यांनी या संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. सदर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पुशेष अटरिया हे असून कर्नाटक राज्यस्तरीय कमिटीचे अध्यक्ष अमित राणी पांडे हे आहेत. त्याचप्रमाणे राज्य कमिटीचे सरचिटणीस भारत जैन हे असून संयोजक सचिव दिनेश पटेल हे आहेत.
प्रधानमंत्री जनकल्याणकारी प्रचार-प्रसार अभियान संघटनेच्या बेळगांव जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी विलास बदामी यांची नेमणूक करण्यात आली आहे. विलास बदामी हे उद्योजक असून त्यांनी यापूर्वी रोटरी क्लब बेळगाव मिड टाऊनच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
उपरोक्त संघटनेच्या बेळगांव शाखेचे अन्य पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत.. सरचिटणीस -श्री गणपती, युथ विंग अध्यक्ष -शिवानंद हिरेमठ, ग्रामीण विकास अध्यक्ष -रमेश देशपांडे, वुमन वेल्फेअर अध्यक्ष -वाणी रामचंदानी, सरचिटणीस -वीणा जोशी, कमिटीचे सदस्य -प्रकाश हिरेमठ, सतीश जाधव, विजय छप्पर, कु. मेघना आणि कु. रेणुका हर्ती.