कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अजूनही शाळा सुरु करण्याबाबत प्रशासन ठाम नाही. शाळा सुरु करण्याबाबत अनेकवेळा नोटीस जारी करण्यात आली आहे.
परंतु विद्यार्थी, पालक, आणि शिक्षणतज्ञांच्या मतांचा विचार करून १२ ऑक्टोबर ते ३१ ऑकटोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा विचार सरकारले केला असून यासंदर्भातील अधिसूचना रविवारी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
कर्नाटकातील अनेक भागात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अजूनही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. शिवाय अनेक भागात विद्यागम योजनतेंतर्गत शिक्षण पद्धती सुरु असून या माध्यमातून अनेक शिक्षक कोविड संसर्गाने बाधित झाले आहेत.
त्यामुळे १२ ऑकटोबर ते ३१ ऑकटोबरच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षण सेवा ही बंदच असेल. त्यामुळे या कालावधीत शाळेचे कामकाज संपूर्णपणे बंद असणार आहे. यासंदर्भातील आदेश मुख्यमंत्र्यांनी रविवारी जाहीर केले आहेत. परंतु अद्याप महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांबाबत कोणताही आदेश जारी करण्यात आला नाही.