संगमेश्वर नगर ते एपीएमसी रस्ता पर्यंत मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. संगमेश्वर नगर चौकात वारंवार रहदारीची कोंडी निर्माण होत असल्याने काही प्रमाणात अपघात घडत होते. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली होती.
मध्यंतरी हा सिग्नल सुरू करण्यात आला होता. मात्र तो पुन्हा बंद केल्याने समस्या निर्माण झाली होती. आता पुन्हा सुरू झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. संगमेश्वर नगर ते बॉक्साईट रस्त्यावर वर्दळ असते.
त्याचबरोबर एपीएमसी आणि भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने त्या ठिकाणी वारंवार कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल बसवावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले होते.
मात्र ते बंद ठेवण्यात आले होते. आता पुन्हा ते सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. येथील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा प्रयत्न यशस्वी ठरत आहे. या चौकातील सिग्नल कायमस्वरूपी सुरू ठेवावा अशी मागणी करण्यात येत आहे.