सीमाभागातील साहित्य संमेलन संयोजकांना प्रशासन आणि कोणाबरोबर सामना करावा लागणार आहे मात्र संमेलनाची परंपरा अखंडित ठेवण्यात येईल कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे नियम पाळून संमेलन भरवण्याचा निर्णय सीमाभागातील साहित्य संमेलन संयोजकांनी बैठकीत घेतला.
बेळगाव शहरातील येथील शहीद भगतसिंग सभागृहात रविवारी संमेलन संयोजकांची बैठक झाली यावेळी बैठकीत ठराव परित करण्यात आला. लेखक संघातर्फे आयोजन केले होते अध्यक्षस्थानी माजी महापौर नागेश सातेरी होते.
प्राचार्य आनंद मेणसे यांनी प्रास्ताविकात सीमाभागातील संमेलन अडचणीत सापडली आहे एकीकडे प्रशासन संयोजकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे पोलिसांच्या माध्यमातून अटी लादण्यात येत आहेत तर दुसरीकडे कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे यामुळे नियोजनात समस्या वाढणार आहेत यावर मात करत संमेलनाची परंपरा अखंडित ठेवणे आवश्यक आहे. कोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारचे नियम पाळत स्थानिक पातळीवर गर्दी न करता संमेलन आयोजित करण्यात यावेत दिवसभराच्या कार्यक्रम आयोजित दोन सत्रात संमेलने घ्यावीत या दृष्टीने प्रयत्न करावेत.
कॉम्रेड नागेश सातेरी म्हणाले गेल्या काही वर्षात संमेलन संयोजका समोर कायदेशीर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे यासाठी संमेलन संयोजकांच्या मदतीसाठी वकिलांची सोय करण्यात येईल संयोजकांची शिखर संघटना स्थापन करण्यात यावी. कडोली संमेलनाचे अध्यक्ष बाबुराव नाडकर म्हणाले संमेलनाची परंपरा कोणत्याही परिस्थितीत खंडित करण्यात येऊ नये संमेलन कोणत्याही परिस्थितीत आयोजित करण्याचे गरजेचे आहे.
साहित्यिक गुणवंत पाटील म्हणाले संमेलनातून भाषा संवर्धनाचे काम होते यामध्ये येणाऱ्या अडचणी बाजूला सरकून संमेलन यशस्वी करावे लागतील निलजी संमेलनाचे शिवाय पाटील मंथन संमेलनाच्या च्या प्राचार्या मनीषा नाडगौडा,शक्ती हरळी संमेलनाचे पाटील शिवाजी शिंदे अशोक पाटील नितीन जुवेकर भरत गावडे अशोका लोखंडी रोशनी हुंदरे या सर्वांनी सूचना मांडल्या.
मधु पाटील यांनी आभार मानले.साहित्य संमेलन शिखर समिती स्थापन करण्यात आली निमंत्रण समितीच्या निमंत्रक पदी गुणवंत पाटील,मधू पाटील यांची निवड करण्यात आली.