बेळगांव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या सहा महिन्यात वाहतुकीचे नियम व कायद्या भंग प्रकरणी दंड आकारण्यातद्वारे 3743.80 लाख रुपयांचा महसूल जमा केला असून गेल्या सप्टेंबर महिन्यात 1042.05 लाख रुपयांची विक्रमी महसूल सरकारच्या तिजोरीत जमा केला आहे.
बेळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या एप्रिल महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत एकूण 37 कोटी 43 लाख 79 हजार 747 रुपयांचा (3743. 80 लाख) महसूल जमा केला आहे. प्रारंभी एप्रिल महिन्यात निराशाजनक महसूल जमा झाला होता तथापि मे महिन्यापासून बेळगाव आरटीओ कार्यालयाच्या महसुलात हळूहळू इतकी वाढ होत गेली की गेल्या सप्टेंबर महिन्यात या कार्यालयाने सरकारच्या 1002.00 लाख रुपये उद्दिष्टाची पूर्तता करताना जादा 40.05 लाख रुपयांचा महसूल जमा केला हे विशेष होय.
यंदा 2020 -21 सालच्या गेल्या एप्रिल महिन्यात बेळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाला 1002.00 लाख रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते तथापि यापैकी अवघे 9.94 टक्के उद्दिष्ट साध्य करता आले. या महिन्यात उद्दिष्टाच्या तुलनेत बेळगांव आरटीओ कार्यालयाला फक्त 99 लाख 55 हजार 211 रुपयांचा (99.55 लाख) महसूल जमा करता आला होता. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीत 902.45 लाख रुपये इतकी तूट निर्माण झाली होती.
मे महिन्यात देखील 1002.00 लाख रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते हे परंतु त्यापैकी 47.80 टक्के उद्दिष्टाची पूर्तता करता आली. या महिन्यात दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत चार कोटी 78 लाख 95 हजार 448 रुपयांचा (478.95 लाख) महसूल जमा झाला होता. त्यामुळे 523.05 लाख रुपयांची तूट निर्माण झाली होती.
जून महिन्यातील 1002.00 लाख रुपयांचा महसूल जमा करण्याच्या उद्दिष्ट पैकी 63.51 टक्के उद्दिष्टांची पूर्तता झाली होती. या महिन्यात 1002.00 लाख रुपयांचा महसूल जमा करण्याच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 6 कोटी 36 लाख 36 हजार 37 रुपयांचा (636.32 लाख) महसूल जमा झाला होता परिणामी मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यातील महसुलातील तुट 365.68 लाख रुपये इतकी कमी झाली होती.
जुलै महिन्यात 1002.00 लाख रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 74.17 टक्के महसूल वसुली झाली म्हणजे 7 कोटी 43 लाख 16 हजार 435 रुपयांचा (743.16 लाख) महसूल जमा झाला. त्यामुळे मागील महिन्याच्या तुलनेत तूट आणखी कमी होऊन 258.84 लाख रुपये इतकी झाली.
ऑगस्ट महिन्यात 1002.00 लाख रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 74.23 टक्के महसूल वसुली झाली म्हणजे 7 कोटी 43 लाख 75 हजार 325 रुपयांचा (743.75 लाख) महसूल जमा झाला. त्यामुळे मागील महिन्याच्या तुलनेत तूट आणखी कमी होऊन 258.25 लाख रुपये इतकी झाली.
गेल्या सप्टेंबर महिन्यात बेळगांव प्रादेशिक परिवहन कार्यालयाला 1002.00 लाख रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या महिन्यात दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे 104.00 टक्के महसूल जमा करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात एकूण 10 कोटी 42 लाख 5 हजार 289 रुपयांची विक्रमी महसूल वसुली झाली. थोडक्यात बेळगाव आरटीओ कार्यालयाने सरकारने दिलेले उद्दिष्ट पार तर केलेच शिवाय त्यामध्ये 40.5 लाख रुपयांची जादा भर घातली.
दरम्यान, मागील वर्षी 2019 20 साली उपरोक्त एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत सरकारने बेळगांव प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दरमहा 1000.00 लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यावेळी मे महिन्यात एकदाच उद्दिष्टाची पूर्तता करता आली होती. त्यावेळी मे महिन्यात 10 कोटी 75 लाख 78 हजार 722 रुपयांचा (1075.79 लाख) विक्रमी महसूल गोळा झाला होता या महिन्यात दिलेल्या उद्दिष्टापेक्षा 75.8 79 लाख रुपयांचा जादा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाला होता.