रोटरी क्लब बेळगांव मिड टाउनतर्फे आयोजित खास कार्यक्रमात कोरोना प्रादुर्भाव काळात जनसेवेला वाहून घेतलेल्या चार कोरोना वॉरियर्सचा यथोचित सत्कार करण्यात आला.
टिळकवाडी येथील एल.ई.एसप्रेसो हॉटेलच्या सभागृहात बुधवार सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरीचे अध्यक्ष रो. अशोक कोळी, सेक्रेटरी रो. नागेश मोरे व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कोवीडच्या नियमांचे काटेकोर पालन करुन कोरोना महामारीत जोखीम पत्करून काम करणाऱ्या नागरिकांचा रोटरी क्लब ऑफ बेळगांव मिडटाउनतर्फे शाल-प्रमाणपत्र-स्मृती चिन्ह-पुष्पगुच्छ देउन यथोचित सत्कार करण्यात आला.
चंद्रकांत हरपनहळ्ळी, वेंकटेश पाटील, महेश लाड व चिराग भातकांडे या सर्वांचा सत्कार मूर्तीमध्ये समावेश होता. या चार कोरोना वॉरियर्सनी विशेषतः लॉकडाउनच्या काळात भिकाऱ्यांना, जनावरांना, इतर गरीब नागरिकांना, परराज्यातील मजूरांना पाण्याच्या बाटल्या, भोजन, आदीची स्वखर्चातून व्यवस्था केली. शिवाय कोवीडने मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्कारही केले. या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ बेळगांव मिडटाउने त्यांना सन्मानित केले.
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून रोटरीच्यावतीने पुढील कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.यावेळी विवेकानंद केंद्र बेळगावच्या किशोर काकडेंनी कन्याकुमारीतील शिला स्मारकाची पुस्तके देत शिला स्मारकाला जरूर भेट द्या, असे आवाहन केले. उपरोक्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रो. सतीश नाईक यांच्यासह रोटरीच्या अन्य सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.