शहरातील बीम्स हॉस्पिटलमध्ये सध्या कोरोना तपासणीच्या रॅपिड इंटिजन टेस्ट (आरएटी) किट्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी आरएटी चांचणीसाठी येणाऱ्या अनेकांना स्टॉक नसल्याचे सांगून माघारी धाडले जात आहे.
दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याचा इन्कार केला असून गोदामामध्ये आरएटी किट्सचा पुरेसा साठा असून सार्वजनिक सुट्ट्यांमुळे हे किट्स उपलब्ध करून देता आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
गेल्या कांही महिन्यांपासून रॅपीड इंटिजन टेस्टचे प्रमाण कमी झाले असून हे सुचिन्ह नाही. कारण सध्या पॉझिटिव्ह चांचण्याचे प्रमाण 1.58 टक्के आहे. त्यामुळे प्रति 1 कोटीच्या सरासरीने 5 कोटी लोकसंख्येच्या पॉझिटिव्ह चाचणीचे प्रमाण 303.8 टक्के इतके होणार आहे.
जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अचानक मोठ्या प्रमाणात झालेली घट याचा अर्थ आरएटी चांचण्याच झाल्या नसल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण उघडकीस आलेले नाहीत.
खरे पाहता जर चांचणी झालेल्यांची संख्या स्थिर राहून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी झाले तरच ते विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चिन्ह म्हणावे लागेल.