गेल्या कांही दिवसातील ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हातातोंडाशी आलेले भात पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने बेळगांव शहर परिसर व तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान खात्याने बेळगांव, गदग, बेळ्ळारी, चिकबळ्ळापूर, चिकमंगळूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, शिमोगा आणि तुमकुर या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला असून याठिकाणी एलो अलर्ट घोषित केला आहे.
परिणामी पावसाचा जोर कमी न झाल्यास बेळगांव शहर परिसर आणि तालुक्यातील पिके विशेष करून भात पिके धोक्यात येणार असून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुधवारी दुपारी सकाळी अकराच्या दरम्यान बेळगाव शहर परिसराला एक तास हून अधिक काळ पावसाने झोडपले पाऊस इतका तुफान होता की शहरातील सखल भागात पाणी साचले होते. विशेषतः वीरभद्र नगर सातवा क्रॉस जवळ ,शिवबसव नगर भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.येडीयुरप्पा रोड सह कामे सुरू असलेल्या शहरातील अनेक रस्त्यावर पाणी तुडूंब वहात होते.