कोविनकोप्प क्रॉसनजीक बेकवाड – बिडी रोडलगत असलेल्या बेळगाव -हल्याळ महामार्गावर काल दुपारी १ च्या सुमारास भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
दुचाकी वाहन आणि क्रुझर यामध्ये भीषण धडक होऊन हा अपघात झाला असून या अपघातात चंदगड तालुक्यातील कानूर गावच्या चेरल्याचा वाडा येथील दुचाकीस्वार यमकु यमकर (वय ६०) याचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले असून बेळगाव जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
घटनास्थळी नंदगड पोलिसांनी भेट देऊन या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.