Thursday, November 28, 2024

/

रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांच्या मदतीसाठी सरसावले उत्तर आमदार

 belgaum

रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांच्या व्यवसायाचा उत्कर्ष व्हावा यासाठी बँक अधिकाऱ्यांनी त्यांना लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करून देण्याद्वारे सहकार्य करावे, असे आवाहन बेळगांव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेसंदर्भात आज सोमवारी सकाळी महापालिका सभागृहांमध्ये बँक अधिकारी, रस्त्यावरील भाजी विक्रेते आणि लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. सदर बैठकीत बोलताना आमदार ॲड. बेनके यांनी उपरोक्त आवाहन केले. सदर बैठकीत पंतप्रधान स्व निधी योजनेअंतर्गत लाभार्थींना कर्ज वितरित करण्यात विलंब होत असल्याबद्दल आमदार अनिल बेनके यांनी उपस्थित महापालिका अधिकारी आणि बँका अधिकाऱ्यांची चर्चा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे तर त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच दयनीय झाली आहे.

रोजच्या भाजी विक्रीवर त्यांचे घरदार चालत असते. त्यांना आर्थिक सहाय्य मिळाल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे आपला व्यवसाय करू शकतील हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. सर्वसामान्यांसह तळागाळातील जनतेच्या उत्कर्षासाठी पंतप्रधान स्वनिधी सारख्या विविध योजना सरकारकडून सध्या राबविल्या जात आहेत. त्यांचा योग्य लाभ संबंधित लाभार्थीना मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे.

पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या अनेकांनी अर्ज भरले आहेत. यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांचे अर्ज मंजूर देखील झाले आहेत. मात्र अद्यापही ही त्यांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य मिळालेले नाही. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन बँक अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना सहकार्य करून त्यांना लवकरात लवकर कर्ज पुरवठा करावा, अशी सुचना आमदार ॲड. अनिल बेनके केली.

सदर बैठकीस महापालिका आयुक्तांसह पालिकेचे संबंधित अधिकारी, विविध बँकांचे अधिकारी आणि शहरातील रस्त्यावर भाजी विकणारे विक्रेते उपस्थित होते. गेल्या 17 ऑक्टोबर रोजी आपण शहरात फेरफटका मारून रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

त्यावेळी अनेक विक्रेत्यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत अर्ज मंजूर होऊन देखील अद्याप आपल्याला कर्ज मिळाले नसल्याची तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेऊन आज बोललेल्या या बँक अधिकारी व मनपा अधिकाऱ्यांच्या बैठकीत आपण संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना लवकरात लवकर कर्ज पुरवठा करावा अशी सूचना केली असल्याची माहिती आमदार अनिल बेनके यांनी बेळगांव लाईव्हला दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.