हेल्मेट सक्ती संदर्भातील नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार आता हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांचे चालक परवाने 3 महिन्यासाठी रद्द केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे 4 वर्षे वयोगटावरील मुलांना देखील यापुढे हेल्मेट सक्ती असणार आहे.
कायद्यानुसार दुचाकी वाहन चालक आणि त्याच्या मागे बसलेल्याने संरक्षक शिरस्त्राण (हेल्मेट) वापरणे अनिवार्य आहे. हा नियम कर्नाटकातील शहरी आणि ग्रामीण भाग अशा दोन्ही ठिकाणी लागू आहे.
मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 194डी नुसार दुचाकी वाहनचालकाने हेल्मेट परिधान केले नसेल तर दंड होऊ शकतो किंवा त्याचा चालक परवाना रद्द होऊ शकतो.
राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) हेल्मेट सक्ती नियमासंदर्भातील कारवाईचा अहवाल दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. मोटर वाहन कायद्याच्या कलम 129 नुसार 4 वर्षावरील मुलांच्याबाबतीत देखील हेल्मेट सक्ती असणार आहे.