पावसाच्या उघडती मुळे समाधान मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा शहरात आणि परिसरात झोडपून काढले होते. मात्र याचा फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे कधी एकदा पाऊस जातो याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. आता पावसाने उघडीप दिल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सध्या बटाटा रताळी व सोयाबीन काढण्याचे काम सुरू आहे. मात्र पावसामुळे त्याच्यात व्यत्यय निर्माण होत होता. आता मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.
त्यामुळे या कामांना गती मिळाली आहे. पुन्हा शेतकरी बांधावर दिसत आहे तर आता पुन्हा भात कापणीच्या कामालाही वेग येणार आहे. काही भागात भात कापणी सुरू झाली आहे तर काही भागात भात पोसवणीला आले आहे. त्यामुळे ही कामे आता जोरदार असून शेतकरी कामात गुंतत आहे.
पावसाने उघडीप दिल्यामुळे बटाटा रताळी व सोयाबीन काढणे कामात जोर आला आहे. त्यामुळे पाऊस जावा अशीच मागणी शेतकर्यांतून वर्तविण्यात येत आहे. मात्र अजूनही ढगाळ वातावरण असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा पावसाला तर मोठे संकट कोसळण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.