श्रीनगर बेळगांव येथील नागरिकत्व सुरक्षा खात्याच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी सकाळी उत्साहात पार पडला.
श्रीनगर बेळगांव येथील राणी चन्नम्मा हाउसिंग सोसायटी नजीकच्या जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांवचे डीजीपी ए. एम. प्रसाद उपस्थित होते. यांच्या हस्ते फीत कापून नागरिकत्व सुरक्षा खात्याच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनापूर्वी होमगार्डच्या जवानांनी डीजीपी प्रसाद यांना मानवंदना दिली.
उद्घाटन समारंभानंतर डीजीपी ए. एम. प्रसाद यांनी सदर कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची रूपरेषा जाणून घेतली. उपरोक्त समारंभास नागरिकत्व सुरक्षा खात्याचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आणि निमंत्रित उपस्थित होते.