महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत नेते आणि १९८३ ते १९९५ या कार्यकाळात चार वेळा उचगाव मतदार संघातून आमदार पद भूषविलेले माजी आमदार बी. आय. पाटील यांचे रविवार दि. ४ ऑकटोबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास निधन झाले.
गेल्या २ दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचाराअंती त्यांचे निधन झाले असून निधानसमयी ते ७५ वर्षांचे होते.
सीमालढा, कन्नड सक्ती विरोधी आंदोलन तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढ्यात, आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. याशिवाय दिल्ली येथे झालेल्या उपोषण आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र एकीकरण समितीचे तालुका अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे,दोन मुली,दोन भाऊ जावई असा मोठा परिवार आहे. उचगावच्या नूतन जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांचे दिर होते.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार वेळा आमदार भूषवत कर्नाटक सरकारला आपल्या कारकिर्दीत सळो की पळो करून टाकलेले व समितीच्या सामान्य माणसांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणून त्यांची छाप होती.सामान्य नागरिकांचे काम करत असताना माय मॅन येस करा म्हणून अधिकाऱ्यांना ठणकावून सांगणारे आमदार बी आय पाटील हे एकमेव नेते होते.
आमदारकीच्या काळात अनेक कामे करत त्यांनी वेगळीच लोकप्रियता मिळवली होती अनेक अधिकारी आणि कर्नाटकचे मंत्री देखील देखील फोर टाईम एम एल ए म्हणून आदराने बोलवत असतं. अश्या या समितीच्या आमदारांना टीम बेळगाव live कडून आदरांजली