जनतेचा वाढता विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मास्कसंदर्भातील दंडाची रक्कम शहरी भागासाठी 250 रूपये आणि ग्रामीण भागासाठी 100 रुपये इतकी केली आहे.
मास्क संदर्भातील दंडाची रक्कम कमी करण्याबरोबरच मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी एका विनंतीद्वारे नागरिकांना स्वयंप्रेरणेने मास्क वापरण्याचे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. स्वयंप्रेरणेने नागरिकांनी मास्कचा वापर करून व सोशल डिस्टंसिंग ठेवून कोरोना महामारीला रोखण्यासाठी शासनाला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी कर्नाटकात मास्क सक्ती करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांना 1000 रुपये दंड आकारण्याचा आदेश राज्य शासनाने नुकताच दिला होता. शासनाच्या या आदेशानुसार शहरात 1000 आणि ग्रामीण भागात 500 रुपये दंड वसूल केला जाणार होता.
या पद्धतीने मास्क न वापरणाऱ्यांकडून जो अव्वाच्या सव्वा दंड आकारण्यात येणार होता त्याला राज्यातील बहुतांश नागरिक आणि संघटनांनी आक्षेप घेतला होता. जनतेचा हा विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दंडाची रक्कम आता 250 व 100 रुपये इतकी केली आहे.