Thursday, January 9, 2025

/

यांनी” केला श्रमदानाने हिंडलगा पाईपलाईन रोड दुरुस्त

 belgaum

हिंडलगा ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्यामुळे “हेल्प फाॅर नीडी” संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी श्रमदानाने हिंडलगा पाईपलाईन रोडवरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त केला.

मुसळधार पाऊस आदींमुळे हिंडलगा पाईप लाईन रोड रस्ता अत्यंत खराब झाला आहे. जागोजागी खड्डे पडून अत्यंत दुर्दशा झालेल्या या रस्त्यामुळे नागरिकांची विशेषता वाहन चालकांची मोठी गैरसोय होत होती. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शॉक ऑब्जरवर, बंपर आदी तुटून वाहनांचे नुकसान होण्याचे प्रकार या ठिकाणी सातत्याने घडत होते. यामुळे वाहनचालकांना भुर्दंड तर बसतच होता शिवाय रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोकाही वाढला होता.

यासंदर्भात वाहनचालकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन हेल्प फाॅर नीडी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी गेले वर्षभर सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हिंडलगा ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला होता. परंतु अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात न आल्यामुळे कंटाळलेल्या सुरेंद्र अनगोळकर यांनी आपल्या हेल्प फोर नीडी या संघटनेच्या माध्यमातून स्वखर्चाने रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.Road work

त्यानुसार हेल्प फाॅर नीडीच्या कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी श्रमदानाने हिंडलगा पाईपलाईन रोडवरील मारुती मंदिर ते साई मंदिरपर्यंतच्या रस्त्यावर पडलेले खड्डे टाकाऊ विटांद्वारे बुजविले. सुरेंद्र अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमात सूनील धनावडे, अमोल चोपडे, प्रभाकर मुरगोड आदिंचा सहभाग होता. सदर रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्त करण्यात आल्यामुळे वाहनचालक आत समाधान व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.