बेळगावमध्ये कॅम्प मधील विविध दसरोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी विजयादशमी दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी प्रशासनाकडे निवेदन सादर केले. प्रतिवर्षी बेळगावमध्ये विजयादशमीदिवशी शहरात मिरवणूक काढण्यात येते. यामध्ये कॅम्प मधील अनेक दसरोत्सव मंडळे सहभागी होतात.
त्यामध्ये तेलगू कॉलनी, मद्रास कोणाला, आर. ए. लाईन, फिश मार्केट, कुंती देवी मंदिर, आणि के. टी. पुजारी या सर्वांच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात येते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण साधेपणात साजरे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे दसरोत्सवही साधेपणात साजरा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
बेळगावमध्ये विविध देवस्थानाच्या सासन काठ्या आणि पालख्या सिमोल्लंघनासाठी ज्योती कॉलेज मैदानावर एकत्रित येतात. तसेच मोठ्या प्रमाणात मिरवणूकही काढण्यात येते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी या सणावरही प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या दसरोत्सव आणि यादरम्यान काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला सशर्त परवानगी द्यावी, अशी मागणी आज विविध दसरोत्सव समित्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. यावेळी प्रशासन ज्या काही अटी घालून देईल, त्या सर्व अटी पाळण्याची ग्वाही या समित्यांच्या वतीने देण्यात आली.
यावेळी बोलताना रमाकांत कोंडुस्कर म्हणाले, कि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे आवश्यक आहे. परंतु सर्वत्र अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. बार, क्लब, पब मध्ये गर्दी होत आहे. अशाठिकाणी प्रशासन कोणतीही कारवाई किंवा नियम आणि अटी घालताना दिसून येत नाही. परंतु मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर सहजपणे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे हिंदू सणांवरही निर्बंध घालण्यात येत आहेत. हे योग्य नाही. बेळगावच्या दसरोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. मोठ्या प्रमाणात येथे सीमोल्लंघन साजरे केले जाते. त्यामुळे दसरोत्सवाला मार्गसूची आखून हा सण साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि कमिश्नर याना सादर करण्यात आले आहे.
हि निवेदन सादर करताना रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह कॅम्प दसरोत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1229550534069204/