स्वच्छ शहर आणि सुंदर शहर हे घोषवाक्य बेळगावला साजनासे झाले आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढत आहे. याचा विचार करत शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये ही कचऱ्याचा ढीग मोठ्या प्रमाणात पडताना रस्त्यावर दिसत आहे.
त्यामुळे यापुढे कोणीही रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी आता ज्या ठिकाणी रस्त्यावर कचरा फेकण्यात येतो त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तालुका कार्यक्षेत्रात प्रत्येक ग्रामपंचायतीत कचऱ्याचे ढीग साचू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यावर कारवाई करून दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे नागरिकांनी रस्त्यावर कचरा फेकू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीत तसा आदेश पाठविण्यात येणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता राखावी असे आवाहन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कचरा असतानाचे दृश्य निदर्शनास येत असून या संबंधी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान बेळगाव शहरातील कचरा 200 टन निर्माण होतो तर ग्रामीण भागातही अधिक प्रमाणात कचरा साचत आहे. त्यामुळे यासाठी आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याबाबत तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
जे कोणतेही नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असतील तर त्यांना दंड आकारण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.