मांडूळ नावाच्या दुतोंडी सापाची विक्री करताना एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून साप ताब्यात घेण्यात आला आहे. जमखंडी येथे मध्यरात्री १२.३० च्या सुमारास वनविभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार मनमुख सर्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, दोन तोंडे असलेल्या सापाची तस्करी यशस्वीरित्या रोखण्यात आली आहे.
बेळगाव वन पथकाच्या पीएसआय रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या या कारवाईत बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील जांबगी गावच्या गोपीनाथ हणमंत कावळे (वय २२) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल एचसी २४९१ यरनाळ, एचसी १७३२ हिरेमठ यांचा समावेश असलेल्या पथकाने ताब्यात घेतलेला दुतोंडी साप जमखंडीच्या एसीएफकडे सोपवण्यात आला आहे. तसेच आरोपीला न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे.https://www.instagram.com/p/CGc4iO5B-QJ/?igshid=1cblvakii7vj6
या सापाचे वर्णन साधारणतः मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंड यामध्ये जवळपास साम्य वाटत असल्यामुळे या सापाला दुतोंडी असे संबोधले जाते. निर्दोष जनावरे-प्राण्यांना स्वतःच्या फायद्यासाठी तस्करी करण्याचे लक्ष्य नेहमीच असते.
परंतु काहीजण मोठ्या किंवा जंगली प्राण्यांचा सौदा करतात, तर काहीजण लहान आणि निष्पाप प्राण्यांचा सौदा करतात. या सापांची किंमत बाजारमध्ये कोट्यवधी रुपयांच्या घरात असते. हा साप शक्तिवर्धक आणि गुप्तधन मिळवण्याच्या अंधश्रद्धेमुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळे या सापाला बाजारपेठेत मोठी मागणी असते.