इबेळगावमधील फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने अनेक कौटुंबिक सोहळे या केले जातात. त्यासोबतच अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात. आता या गृपच्यावतीने एक नवा उपक्रम करण्याचे ठरविले आहे. या उपक्रमाची संकल्पना हि गरजू आणि होतकरू कुटुंबाच्या संदर्भातील आहे.
समाजात प्रत्येकाला त्याच्या आनंदाचा सोहळा साजरा करण्याची इच्छा असते. परंतु याच समाजात असे काही घटक असतात ज्यांना आपल्या आनंदाच्या, कौतुकाच्या सोहळ्यात इतरांना सामावून घेण्याची आणि असे सोहळे मोठ्या प्रमाणात साजरे करण्याची परिस्थिती नसते.
अशा होतकरू आणि गरजू कुटुंबियांचे कौटुंबिक सोहळे साजरा करण्याचा संकलप फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या वस्तुंचा आणि आवश्यकतांचा संग्रह करून तो त्यांना सुपूर्द करण्याचाही संकल्प या ग्रुपने केला आहे.
फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आज खानापूर तालुक्यातील हुसनवाडी या जंगल परिसरातील गावाला भेट देण्यात आली. हा खानापूर तालुक्यातील दुर्गम भाग असून या भागात राहणाऱ्या गरजू आणि होतकरू लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी फेसबुक फ्रेंड्स सर्कल ग्रुपचे डॉ. संतोष दरेकर, समीर शेख, साहिर शेख, गुलाब जंगू शेख, रवी लाड, संजय अंगडी, प्रशांत बिर्जे, अमित परमेकर, धनंजय पाटील आदी उपस्थित होते.
समाजातील अशा अनेक गरजू लोकांना अनेक गोष्टींची गरज आहे. या गरजा पूर्ण करणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे आपल्यापैकी कुणालाही अशा लोकांना कोणत्याही प्रकारची मदत करायची इच्छा असल्यास ९९८६८०९८२५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन फेसबुक फ्रेंड्स सर्कल च्या वतीने करण्यात आले आहे.