विद्युत वाहिनीच्या वेळीच दुरुस्तीमुळे टळला अनर्थ

0
4
Ccb
 belgaum

पथदीपांच्या रस्त्याशेजारी असणाऱ्या कंट्रोल पॉईंटच्या ठिकाणी उघड्यावर पडलेल्या जिवंत वीजप्रवाह असलेल्या वायरची वेळीच दुरुस्ती झाल्यामुळे संभाव्य अनर्थ टळल्याची घटना अंजनीनगर येथे घडली.

शहरातील पथदीपांचे कंट्रोल पॉईंट सुरक्षित ठेवणे आणि त्यांची देखभाल करणे हे काम महापालिका प्रशासनाचे आहे. तथापि अंजनेयनगर येथील पथदीपांच्या कंट्रोल पॉईंट बॉक्सकडे दुर्लक्ष झालेले असल्यामुळे त्याच्या आसपास रान उगवले आहे. त्याचप्रमाणे बॉक्सचा दरवाजाही निखळून पडला आहे.

या दुर्लक्षित कंट्रोल पॉईंटमधील जिवंत वीजप्रवाह असलेली एक वायर धोकादायक अवस्थेत जमिनीवर पडलेली नागरिकांना आढळून आली.Ccb

 belgaum

याबाबतची माहिती मिळताच एइई सीएसडी3 हेस्कॉमच्या संजीव हनमण्णावर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्ती केल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला.

दुरुस्तीद्वारे वायर सुरक्षित करण्याबरोबरच हनमण्णावर यांनी कंट्रोल पॉइंट बॉक्सच्या आसपासचे रान व कचरा काढून स्वच्छता देखील केली. याबद्दल एइई सीएसडी3 हेस्कॉमला नागरिकांनी धन्यवाद दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.