सहकार क्षेत्रातील साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून निवड जाहीर होतात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडून दर पाच वर्षांनी होत असते दरवर्षी तुळशीने पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी यावेळी वर्गातील 9 जागांसाठी 18 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्याचप्रमाणे इतर वर्गांच्या सहा जागांसाठी 13 जणांचे अर्ज आले होते परिणामी निवडणूक होणार की उमेदवार बिनविरोध निवडून येणार याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले होते निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून अर्ज माघारीसाठी प्रयत्न केले जात होते याला प्रतिसाद देत वर्गासाठी अर्ज केलेल्या 18 जणांपैकी नऊ जणांनी तर इतर गटांसाठी अर्ज केलेल्या 13 पैकी सात जणांनी निवडणुकीतून माघार घेतली यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक गोडपण्णावर यांनी जाहीर केले आहे
बिनविरोध निवडीसह विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. अ-वर्ग : आसिफ मुल्ला (मारीहाळ), निंगाप्पा नायक (बोडकेनट्टी), प्रमोद पाटील (बसवन कुडची), महांतेश अलाबादी (बडसखुर्द), राजेंद्र अंकलगी (बडाल अंकलगी) विनय कदम (मण्णूर), विरुपक्षी मजगी (हुदली), शंकरगौडा पाटील (विरसीनकोप) व सुरेश सावंत (बेकिनकेरे) ब -वर्ग महिला गट : नागरत्न शिंत्री (हिरेबागेवाडी) व लक्ष्मी सोनजी (सांबरा) ओबीसी अ -वर्ग : शिवणगौडा पाटील (विरसीनकोप), ओबीसी ब -वर्ग : नंदी उळवप्पा (हिरेबागेवाडी), अनुसूचित जाती : दिलीप कांबळे (हंगरगा) अनुसूचित जमाती : लक्ष्मण नायक.
दरम्यान, बेळगांव तालुका मार्केटिंग सोसायटीवर एकेकाळी बेळगाव तालुक्यातील मराठा समाजाचे वर्चस्व होते. मात्र कालांतराने ते कमी होत गेल्याचे पहावयास मिळत आहे. आजच्या घडीला या सोसायटीच्या निवडणुकीत पंधरापैकी केवळ दोन जागांसाठी मराठा समाजाच्या विनायक कदम व अन्य एक अशा दोघा जणांना प्राधान्य देण्यात आले आहे.