काँग्रेस राज्याध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी आज सीबीआय पथकाने छापा टाकला आहे. या छाप्याविरोधात केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी टीका केली असतानाच या टीकेचे प्रत्त्युत्तर पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिले असून डीकेशी आपले जुने मित्र आहेत, त्यांच्या निवासस्थानावर घालण्यात आलेल्या छाप्यातून ते सुखरूप पार व्हावेत, अशा शुभेच्छाही त्यांनी डीकेशींना दिल्या आहेत.
बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले कि, केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर सीबीआयने कारवाई करत त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला आहे.
परंतु यामागे भाजप राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला आहे. या कायदेशीर कारवाईतून डीकेशींना यश मिळावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
डी. के. शिवकुमार यांनी कोणतीही चुकीची गोष्ट केली नसेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. आणि लोकसभा पोटनिवडणुकांचा आणि सीबीआयच्या या कारवाईचा कोणताही संबंध नाही, त्यामुळे यावर वायफळ चर्चा करण्यात येऊ नये, असेही मत त्यांनी व्यक्त केले.