बेळगाव जिल्ह्याच्या डीसीसी बँकेच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांचे अर्ज भरवायची प्रक्रिया २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. या निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळातील दिग्गज नेतेमंडळी आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तयार झाली असून बेळगाव जिल्हा आणि तालुक्यातील अनेकांनी आपले नशीब आजमाविण्यासाठी सर्वतोपरी तयारी सुरु केली आहे.
चिक्कोडी येथील खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्यात या निवडणुकीत मोठा संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि रमेश कट्टी गटाकडूनही यावेळी बिनविरोध निवडणूक लढण्याची तयारी करण्यात येत आहे. आरएसएसकडून अशाप्रकारचे निर्देश आल्याचे बोलले जात आहे. तर चिकोडी तालुक्यातून आमदार गणेश हुकेरी यांनी संपूर्ण बळानिशी हि निवडणूक बिनविरोध लढण्याचे ठरविले आहे.
त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार अरविंद पाटील यांनीही डीसीसी बँकेवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जोरदार तयारी चालविली आहे. यांच्यासह बीजेपीचे नेते विठ्ठल हलगेकर, आमदार अंजलीताई निंबाळकर यादेखील या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होणार आहेत.
डीसीसी बँक निवडणूक हि भाजपच्या प्रतिष्ठेचा एक भाग आहे. भाजपच्या वतीने संपूर्ण ताकदीनिशी हि निवडणूक लढविण्यासाठी तयारी होत आहे. या निवडणुकीत भाजपाला काटशह काँग्रेसला देता येईल का? महाराष्ट्र एकीकरण समितीच्या जागा या बँकेवर निवडून येतील का? हे पाहणे आता निर्णायक ठरणार आहे.