दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना मिळणारी सुट्टी कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली असल्याचे शिक्षण खात्याने एका आदेशाद्वारे जाहीर केले आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा शिक्षण खात्याने 2020 -21 या शैक्षणिक वर्षातील सत्र आणि मध्यावधी सुट्टी रद्द केली आहे. त्यामुळे शाळांची दसरा सुट्टी रद्द झाली असली तरी सध्या सुरू असणारा विद्यागम कार्यक्रम नियमितपणे सुरूच ठेवावा, त्याचप्रमाणे शिक्षण खात्याकडून शैक्षणिक कार्यक्रमासंदर्भात देण्यात येणार्या आदेशांचे पालन करावे असेही आदेश पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कोरोनामुळे राज्यातील शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत यासाठी शिक्षण खात्याने दसऱ्यानिमित्त 3 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरपर्यंत दिलेली मध्यावधी सुट्टी रद्द केली आहे. शिक्षण खात्याच्या संचालकांनी गुरुवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
दरवर्षी शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र संपल्यानंतर 3 ऑक्टोबरपासून शाळांना दसऱ्यापर्यंत सुट्टी दिली जाते. मात्र आता शाळा सुरू नसल्यामुळे ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे.