संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्या कोरोना महामारीमुळे अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत तर अनेक जण त्याची शिकार बनले आहेत. मात्र नेमके आणि कशामुळे आजारी पडलो हे नागरिकांना समजत नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मुतगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सांबरा येथे मोफत कोरोना टेस्ट घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी जवळपास पन्नास जणांनी आपले नमुने तपास करून घेतले आहेत. मात्र बहुतेक जणांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही जणांनी तर कोरोना महामारितून वाचण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या मात्र त्याचे शिकार बरेच झाले आहेत.
दरम्यान हीच नागरिकांची गरज ओळखून मुतगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोविड टेस्ट सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने अशा टेस्ट सुरू कराव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र प्रत्यक्षात तसे होत नसून सरकारी दवाखाना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
दरम्यान मुतगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ही मोहीम राबवण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर नागरिकांची योग्य ती तपासणी करून त्यांना योग्य उपचार करावेत या दृष्टिकोनाने मुतगा ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे त्यांची ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी प्रत्येक जण झटत आहेत. त्याचप्रमाणे आता प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत असे प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी कळविले आहे.
त्यामुळे ही मोहीम यशस्वी ठरावी आणि नागरिकांना कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा साऱ्यातून व्यक्त होत आहे. याबाबत तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही मोहीम प्रत्यक्षात राबवण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे मुलगा ग्रामपंचायतीमध्ये टेस्ट करण्यासाठी आरोग्य विभागाने दाखवलेले प्रयत्न याला कारणीभूत आहेत. यापुढे प्रत्येक ग्रामपंचायत असा उपक्रम राबवावा आणि कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.