कोविडच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली होती. रेल्वे प्रवास इतर प्रवासाच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. सणासुदीच्या काळात उत्सवासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांतून हॉलिडे स्पेशल ट्रेनची मागणी वाढली आहे.
रेल्वे मंत्रालयाने देशभरात गर्दीच्या मार्गांवर २२ क्लोन ट्रेन सुरू केल्या आहेत. बेंगळुर ते मुंबई हा मार्ग गर्दीचा मार्ग म्हणून ओळखला जातो.
त्यामुळे या मार्गावर स्पेशल क्लोन रेल्वे सुरू करण्याची मागणी सिटीझन्स कॉउन्सिलने रविवारी रेल्वे विभागाकडे केली. यासोबतच बेंगळुर, पुणे, मुंबई, मैसूर या मार्गावर विशेष रेल्वे सुरु करण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सिटीझन्स कॉउन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सेवंतीलाल शहा, अरुण कुलकर्णी, एस. सुरेश स्टेशन अधीक्षक एस गिरीश यासह इतर उपस्थित होते.